व्यथा
व्यथा
भावाचे ना प्रेम मिळाले
बहिणीची न छाया मिळाली
मनी मानसी मी कुढत राहिलो
माझी व्यथा ना कुणा कळाली -२
स्वार्थाने हे सगळे भरले
कामास्तव मज जवळ धरले
ईच्छा मनीच्या पूर्ण होता
माझे अस्तित्व तिथे ना उरले
आशा मनीची धुळीस मिळाली
माझी व्यथा ना कुणा कळाली -२
घरासाठी मी झिजतच गेलो
दिवस रात्र मी राब राबलो
मातापित्यास्तव सतत धावलो
सोडून गेला पिता मजला
ज्याने त्याने स्वार्थ साधला
त्यासाठी मी आता परका झालो
मज प्रेमाची ही शिक्षा मिळाली
माझी व्यथा ना कुणा कळाली-२
सर्वच मजसी अबोल झाले
मजपासून खूप दूरच गेले
नात्यांचेही बंध निखळले
त्या स्मृती जेव्हा मनी दाटता
गालावरती अश्रू ओघळले
मज सेवेची ही शिक्षा मिळाली
माझी व्यथा ना कुणा कळली -2
