येऊ नकोस
येऊ नकोस
घायाळ मनाला आणखी घाव देऊ नको
तुझ्या स्वार्थाला प्रेमाचे नाव देऊ नको
घेतल्या होत्या शपथा,
घेतले होते वचन सारे
राहू दे माझ्याकडे परत आता देऊ नको
जखम आहे अजून ताज्या
घाव अजुनी घालू नको
प्राण फक्त उरलाय
आता तोपण घेऊ नकोस
डाव तूच मांडलास हा खेळ
तूच जिंकलास मोडुनीय मन माझे
खेळ प्रेमाचा मांडलास
पुन्हा हा डाव मांडू नकोस
आणखी घाव देऊ नकोस
