STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational Tragedy

3  

Latika Choudhary

Inspirational Tragedy

माय जिंदगीभर जळत

माय जिंदगीभर जळत

1 min
14.9K


वृत्त=मंजुघोषा(गझल-7)

गालगागा गालगागा गालगागा

मायमाझी जिंदगीभर जळत होती

सोसलेली सल जशी ती दळत होती

भंगलेल्या भावनेची भावसुमने

जोड़ताना तार ती हळहळत होती

 कैद केले बंधनी मी काळजाला

जीवनी जागीच मग ती पळत होती

प्रेममाया वाटताना दीनदुबळया

बांधलेली ती शिदोरी गळत होती

जाळताना जीव सारा आसमंती

देहवेली का धरेला वळत होती

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational