श्रद्धांजली
श्रद्धांजली
त्सुनामी लाटांनी रौद्ररुप धारण करुनी
का नेलेत प्राण लाखांनी ?!!
चांगला उत्तमसा हा अर्थ सोडूनी
सागरी लाटा का आल्या उफाळुनी
सन २००४ चा २६ डिसेंबर दिन का
आला काळ होवुनी ?!!
महाप्रलय कसा झाला नसता ध्यानी-मनी
पळे जनता बापडी भयभीत होवुनी
पण राक्षसी लाटांनी घेतले जीव कितीतरी
तांडव-नृत्य करुनी !!
अनेक कुटुंबे उध्वस्त हो झालीत
किती माय-लेकरांची ताटातूट झाली
किती राजा-राणींच्या सुखीसंसाराची नौका
त्सुनामी लाटांनी गडप केली!!
हरलीत लाटांमधे सारी नाती-गोती
शोधुनही ना लागे कुणी कोणाच्या हाती
जगलेली पाहती वाट आपापल्या आप्तजनांची
किरण आशेचा घेवुनी!!
मदतीचा हात सारे त्सुनामीग्रस्तांना देती
विविध रुपे अधिकारी ही सहकार्य हो करिती
पण लाटांमध्ये हरवलेली रक्ताची नाती
येऊन मिळतील का कधी ? !!
नको दर्याराजा भूकंपानं असा कोपू
त्सुनामी, तुफानी लाटांनी प्रलयंकारी नको होवू
हाहा:कारात तुझिया सामावलेल्या आबालवृध्दांना
खिन्न मनानं श्रद्धांजली!!!
