तंग झालो
तंग झालो
कोरोनाने केले
असे हे जगणे
जगणेच आता
नकोसे वाटणे.
उलटले वर्ष
तंग झाला जीव
कोंडून राहणे
झालोच निर्जीव.
देवा दया तुझी
असो आम्हावरी
कर निवारण
श्रद्धा तुझ्यावरी.
सकारात्मक ती
बाळगावी वृत्ती
होईल आपली
इच्छा आता पुर्ती.
विश्वास ठेवावा
देव करणारा
तोच आहे आता
आम्हा तारणारा.
