आई
आई
आई म्हणजे प्रेमाचा सागर,
देवाहून मोठ्या मायेची घागर .
नऊ मास पोटी वाढवते,
आयुष्यभर कुशीत ठेवते.
ओठांवरती एकच शब्द ,
आई , आई तूच फक्त.
तिच्या भोवती फिरत मी राहतो,
प्रत्येक क्षणी तिलाच आठवतो .
तू असताना तुलाच रागावतो ,
तुझ्याशीच चिडतो , ओरडतो .
तू नसताना तुलाच शोधतो ,
तुला शोधण्यासाठी भटकतो .
तुझ्या सारखी तूच एकटी,
हरेक जन्मी यावे मी तुझ्याच पोटी.
आई, आई म्हणत पुन्हा मी येईन ,
तुझ्या कुशीतच झोपी जाईन .
तीच अंगाई पुन्हा तू गा,
स्वप्नी पुन्हा मला घेऊन जा .
