भावना
भावना
1 min
8
ओसरल्या भावना
मन माझे तू धाव ना
मनामनात वावरणारी तू
क्षणाक्षणात घाबरणारी तू
कधी कधी मनाची आस
मधेच तुझा होणारा भास
कंठात अडखळल्या गोष्टी
मजसंगे भिजली सृष्टी
वाट पाहतो संपव्या या वेदना
ना राहावी माझ्यात चेतना
कधी यावी तूही मजसंगे
रंगून जावू माझ्या प्रेम रंगे
थांबविले यांना किती मी,
सुनावले यांना किती मी ,
तरीही वाहत गेल्या
नाही राहिल्या काही केल्या
तूही तोड बांध हा आता
एकदा बघ जाता जाता
मी तुझ्याविना अपुरा
कर मला तू पुरे आता
