धडा
धडा
आयुष्यातला धडा शिकवायला नको कोणती शाळा
नको कोणी गुरुजी नी नको पाटी पुस्तक
अनुभवाचे घोट पिऊन तो सर्वकाही शिकतो
भाषा सगळ्या ऐकून ऐकून शिकतो
हिंदी ,मराठी, कन्नड , मल्याळी
ते थेट इंग्रजी सुध्दा येते त्याला
हातावरची बोटे मोजत तो जीवनाचे गणितही मांडतो
पोटात आग लागली की काम करायला निघतो
अन् चार पैसे कमावून जेवण बनवायला ही शिकतो
कोण माझ्या पाठी अन् कोण माझ्या पुढे
याचे भान नाही त्याला फक्त ध्येय मात्र दिसत
कोणी मला मदत केली कोणी माझा फायदा घेतला
सर्व काही माहीत असत पण तो काही बोलत नाही
बोलत फक्त त्याच काम कळत फक्त त्याच नाव
तो कोण कोणी ओळखत नाही
पण त्या शिवाय कुणाचं पान हलत नाही
अंधारातून सुध्दा जो स्वतः एक आशेचा दिवा तेवत ठेवतो
तोच खर आयुष्याला पूर्णपणे जगत असतो
जिथे जाईल तिथे नवे त्याचे विश्व असते
नवीन गोष्टी अन् नवीन सारे अनुभव असतात
आयुष्यतला एक एक दिवस येतो तसा संपत नाही
काहीतरी नवीन त्याला भेटल्या शिवाय राहत नाही
