तुझ्याविना काही दिवस
तुझ्याविना काही दिवस
एकटा घरात बसून मी बियरची बाटली उघडेन
मस्त टीव्ही चालू करून क्रिकेट बघेन
माझ्या आवडीची बिर्याणी बाहेरून मागवेन
मित्रांना बोलवून मस्त पार्टी करेन
येईल तिचा फोन तेव्हा म्हणेन
तिला यायची नको करू घाई
मी मस्त मजेत आहे
थोडे दिवस तिथेच रहा बाई
माझे थोडे पैसे आता मलाच करू दे खर्च
मनापासून मागतो नाकारू नको हा अर्जं
मलाही थोडे दिवस स्वातंत्रात जगू दे
तूही तुझ्या घरी बिनधास्त राहून ये
कोणी नाही विचारणार तुला काही प्रश्न
मी मोकळा राहीन होणार नाही त्रस्त
चार दिवसांनी पुन्हा मग आपण भेटू
पुन्हा चार भिंती मध्ये आपणच राहू
नको नको त्या गोष्टीवर करू चर्चा काही
नंतर कळेल त्यांना काहीच अर्थ नाही
म्हणूनच काही दिवस तू तुझ्या सोबतच रहा
स्वतःसाठी काहीतरी नवीन करून पहा
जुन्या मित्र मंडळीत पुन्हा जाऊन शामील हो
अन् जुने दिवस पुन्हा जग एकदा
तेव्हा कळेल तुला तू कुठे हरवलिस
आणि तुजकडून काय हवे मला
मीही मला शोधेन मग माझ्या
जुन्या आठवणीत, जुन्या मित्रांमध्ये ,जुन्या गल्लीत
