नाती
नाती
कोण कुठल्या वाटेवरती,
कशी पावले माझी वळती
मन माझे कुठे धावते ,
हृदय कोणत्या गाव जाते
कोणा संगे कसे बोलावे ,
कोणा संगे कसे वागावे
कुठे बोलावे , कुठे नाही ,
हे मजला कळत नाही
गप्प मी बसलो तरी चुकीचा ,
बोललो तरीही नाही कुणाचा
भेद कळे ना हा नात्याचा ,
मी रागावतो, मी ओरडतो ,
तरीही मी का त्यालाच शोधतो
कोण , कोणाचा मी आहे हे ,
कसा दरवेळी मीच विसरतो
तिसरा येतो माझ्या दारी,
त्याच्याशी मी गोड बोलतो
पण माझ्या बरोबरीचा त्याला ,
दरवेळी गृहितच धरतो
त्याने माझे सर्व करावे ,
त्याने माझे सर्व सहावे ,
मी बोलावे त्याने ऐकावे,
चार चौघात गप्प राहावे
माझ्या इच्छा , माझी मर्जी ,
त्याला साधी अर्जी ही नाही
त्याने फक्त सहन करावे ,
प्रश्न कधी ना विचारावे
नात्यांचा कसा खेळ हा ,
एकाने जिंकत राहावे ,
दुसऱ्याने हरत राहावे
बरोबरी चे आपण म्हणनारे ,
कधी मागे पुढे राहुन जाती
एक रंगीत , एक बेरंगी ,
तरीही जुळवती कशी तरंगे
ही नात्यांची उणीव की ,
ही नात्यांची जादुगिरी
कधी वळता वळत नाही,
कधी जळता जळत नाही
पण एक दिवस असाही येतो,
नाते हाती राहत नाही,
कितीही घट्ट पकडले तरीही
हात त्यांचा सुटून जातो ,
फक्त आठवण राहते मग
एकट वाटत तेव्हा हेच ,
भरलेलं जग
पण तेव्हा मी एकटाच राहतो
अन् पुन्हा मला हा प्रश्न पडतो
कोण कुठल्या वाटेवरती ,
कशी पावले माझी पडती ?
