सवय तुझी
सवय तुझी
एवढी सवय झाली आता
दिवस संपलेलाही कळेना..!
रोज तुला बोलल्याविना
एक दिवसही करमेना..!!
तुझे सुंदर डोळे..ओठ
पाहताना मन अजून भरेना..!
तुझ्या मधाळ स्वराविना
दुसरे काहीच एकवेना..!!
रोज ऑनलाईन चॅट करताना
दुसरे काहीच मला दिसेना..!
माझ सगळ जग तुझ्यात
तुझ्याशिवाय काहीच सुचेना..!!
तुझ्या आठवणीत हरवताना
एकांतही हल्ली आठवेना..!
ये मिठीत माझ्या राणी
तुझा विरह आता सोसवेना..!!

