ती आणि तो
ती आणि तो
तो-
स्पंदनात तु अन
गोड बंधनात मी
सत्यात तु अन
स्वप्न रंजनात मी
कोड्यात तु अन
संभ्रमात मी
आनंदात तू अन
उल्हासात मी
प्रश्नात तु अन
उत्तरात मी
ती-
हृदयात मी अन
श्वासात तु
शब्दात मी अन
कवितेत तु
पावसात मी अन
सरीत तु
साडीत मी अन
जरीत तु
विचारात मी अन
कल्पनेत तु
त्यात ती अन
तिच्यात तो

