बुजगावण ( एका प्रेमाची गोष्ट)
बुजगावण ( एका प्रेमाची गोष्ट)
बुजगावणया वरती
कुणी प्रेम करत काय?
हो आता ते आहेच इतक गोड
मग माणूस करेल तरी काय
बोलण एकदम प्रेमळ त्याचे
त्याचे लांब हात पाय
चेहरा अंड्या सारखा त्याचा
हाव भावाचा पात्याच नाय
बुजगावणं शेतात माझ्या डोलतय वाऱ्यावरी
न तुला बघून माझा जीव खाली वरी
असतेस निशब्द गाल फुगवून
अगदी त्या मडक्या बुजगावण्या सारख
तुझ रूप ही आहे त्या सारख
बारीक जणू शेवग्याच झाड
हवीस मला तू नेहमी समोर
माझ्या हसत हसत माझ्याकडे बघत
पाखरांची काय टाप जे फिरकतील
आसपास बुजगावणं असताना
तशीच पोरींची काय हिम्मत येतील
माझ्या जवळ तू असताना
बसतो गुडघ्यावर पुढ्यात या बुजगावणंयाच्या
विचारतो होशील की माझी आयुष्यभर
राखशील का मन माझ आयुष्यभर
राह उभी पुढ्यात माझ्या
देतो जागा हक्काची
मनाच्या शेतात माझ्या कायमची
हो माझा अडकलाय
जीव बुजगावणं वरती
राहील का ते घरी माझ्या
करेल का प्रेम माझ्यावरती
वादळ आले एक दिवशी
गेले बुजगावणे उडून
मग काय करणार आता
ठेवले नवीन उभ करून

