तुझ्याविना माझी मिठी मोकळी
तुझ्याविना माझी मिठी मोकळी
तुझ्याविना माझी मिठी मोकळी वाटते ना
तुझ्याविना तुझा वाटसरू तुला शोधतो ना....
असा एकटा जगण्याला अर्थ नाही ना खरा
असा एकटा जगण्याला अर्थ नाही ना खरा
तुझ्या मनात चाललेल्या हालचाली पाहवणारे
तुझ्या वचनात मी पूर्ण बांधलो गेलो आहे रे
तुझ्या प्रेमात होत असणाऱ्या वेदना मला
तुझ्याविना चेहरा आठवतो सांगू कुणाला
सारखं असं होतं कधी भेटेल तू शोधून मला
असा एकटा जगण्याला अर्थ नाही ना खरा
असा एकटा जगण्याला अर्थ नाही ना खरा
तू असा राग धरून जायचं नव्हता
नाही तुला त्रास देणार कुणी आता
रोज रस्त्याच्या वाटेवर डोळे लावून
डोक्यावर सूर्य तळपतो तरी पापणी
खाली होईना का तर तुझी अाशा
लागून राहिली ना.....!
तुला माझी अजूनही कळकळ का येईना
तुझ्यावरती जीवापाड प्रेम केलं होतं ना
अजून कित्ती दिवस अबोला ठेवणार आहे ना......
असा एकटा जगण्याला अर्थ नाहीं ना खरा
असा एकटा जगण्याला अर्थ नाही ना खरा
