आधार ( अभंग रचना )
आधार ( अभंग रचना )
फाळ नांगराचा | घुसला शेतात |
वाट ढेकळात | तापतसे ॥ १ ॥
डोईवर हंडा | अनवाणी पाय |
भटकते माय I पाण्यासाठी ॥ २ ॥
निळ्या आकाशात | ढग कापसाचे I
डोळे चातकाचे | पानावले ॥ ३ ॥
नव्या उमेदिनं I बाप तो चालला |
ढेकळी बसला | पहातच ॥ ४ ॥
आधार कोणाचा | वाली कोणी नाही I
खुल्या दिशा दाही | हाती काठी॥ ५ ॥
