STORYMIRROR

Jyoti gosavi

Tragedy

3  

Jyoti gosavi

Tragedy

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती

1 min
173

अनादी काळापासून

तिनेच का जळायचं

अपमानाच्या वणव्यात

तिनेच का पोळायचं

कधी ती सीता होते

अग्निदिव्या ची परीक्षा देते

पतीच्या सन्मानासाठी

वनवासी परित्यक्ता होते

कधी ती द्रौपदी होते

पाचांची भोग्या होते

पाच पराक्रमी पती

 असून देखील

तिचेच वस्त्रहरण होते

युद्ध हरल्यानंतर जेते

स्त्रीवरच करतात अत्याचार

राणी असो वा दासी

तिच्यावर होतो बलात्कार

पुरुषी अहंकाराच्या दंभा खाली

ती सदैव भरडली जाते

हसरे मुखवटे घालून

 ती समाजात वावरली जाते

किती दिशा? किती निर्भया?

 बस झाले सारे आता

भूतलावर उरला नाही

 तुझा कोणी त्राता

 रानटी श्वापदे हे सारे

घाबवितात तुला हींस्त्र चेहरे

बस झाले जळून मरणे

आता जाळायला शीक

घे हातात शस्त्र

नको मागू दयेची भीक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy