Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy

2.5  

Rakesh More

Romance Tragedy

जीवन तुझ्याशिवाय

जीवन तुझ्याशिवाय

1 min
182


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे जगणे श्वासाशिवाय 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे जगणे ध्यासाशिवाय ||1||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे निखळता तारा 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे दिशाहीन वारा ||2||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे साचलेलं पाणी 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे अधुरी गाणी ||3||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे न संपणारी रात्र 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे शून्य मात्र ||4||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे आर्त किंकाळी 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे रात्र काळी ||5||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे उदास मन 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे एकटा क्षण ||6||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे फक्त नैराश्य 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे संपलेलं हास्य ||7||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे प्रेमाचा अंत 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे न संपणारी खंत ||8||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे डोळ्यात पाणी 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे अधुरी कहाणी ||9||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे तुझी आस 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे अधुरा प्रवास ||10||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे ओसाड माळरान 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे दुःखात प्रयाण ||11||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे स्वप्नभंग 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे चित्र बिना रंग ||12||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे दुःखाची सीमा 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे भग्न प्रतिमा ||13||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे वाट पाहणे 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे अधुरे राहणे ||14||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे अस्थिर मन 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे हृदयावर व्रण ||15||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे फक्त वेदना 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे शून्य चेतना ||16||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे रसहीन जगणं 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे दृष्टिहीन बघणं ||17||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे काळा अंधार 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे रिक्त शृंगार ||18||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे नापिक जमीन 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे सारं हीनदीन ||19||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे विना अर्थ 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे सारं व्यर्थ ||20||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे कठीण परीक्षा 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे कठोर शिक्षा ||21||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे काट्यांचा पथ 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे मृत्यूचा रथ ||22||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे विष पिणं 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे निरर्थक जिणं ||23||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे तुला शोधणं 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे हृदय तोडणं ||24||


जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे आशाभंग 

जीवन तुझ्याशिवाय 

म्हणजे मृत्यूशी संग ||25||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance