STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Classics

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Classics

क्षणिक खेळ

क्षणिक खेळ

1 min
162

आयुष्य आहे खेळ

काही सांगताच येत नाही

ऊन सावल्यांचा लपंडाव सारा

मुठीत बांधताच येत नाही...

श्रावणाच्या सरींसारखी

सुख दुःखाची बरसात सारी

जगलो तो क्षण आपला

गेलेला आणताच येत नाही

आयुष्य आहे खेळ काही सांगताच येत नाही...

माझं घर , माझं मुल

माझा संसार , माझी चूल

या माझ्या माझ्या मध्येच गुंतत जातो जीव

सोडताना श्वास त्यातच अडकत जातो जीव

देवाकडे दोन क्षण जास्त मागताही येत नाही

आयुष्य आहे खेळ काही सांगताच येत नाही...

मनाच्या एका खोल कुपित

दडली असतात काही गुपित

वाटतं सांगून टाकू शेवटल्या क्षणी

तो क्षण मात्र सांगून काही येत नाही

आयुष्य आहे खेळ काही सांगताच येत नाही

काहीच सांगता येत नाही..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics