जीवनाचा एक रंग पांडुरंग 🙏
जीवनाचा एक रंग पांडुरंग 🙏
दोन वर्षे पडला *देहाचा वारीत खंड*
पण मनात होता तुझ्या *भक्तीचा च गंध*
असा *न सुटणारा आमुचा छंद*
*भक्तीचा* असा एक *रंग*
*पांडुरंग पांडुरंग*
असेल या *देहात प्राण*
गाऊ दे तुझ्या *महिमेचे गुणगान*
तुझ्या *भेटी* पुढे नसते कसलेच आम्हां *भान*
असा हा ओढ लावी तुझा *सावळाच रंग*
*पांडुरंग पांडुरंग*
वारीत घुमतो जसा *विना, टाळ, मृदूंग*
तुझ्या *नामाच्या भक्तीत* सगळी *गुंग*
वारीच्या *पताकांचा* जसा *भगवा रंग* 🚩
असा तुझ्या *केसराच्या* नामाचा एक *रंग*
*पांडुरंग पांडुरंग* 🙇♂️🚩
थकला जरी आमुचा हा *देह*
तरी सुटणार नाही तुझ्या *भेटीचा मोह*
असा आमुचा हा तुझ्या नामाच्या *आनंदाचा डोह*
असा *नामाच्या* रंगात *रंगला श्रीरंग*
*पांडुरंग पांडुरंग*
*वारीत* येतात *लाखो तुझी लेकरे*
जशी सगळेच तुझे *सगे-सोयरे*
असा हा तुझ्या *नात्याचा* *वेगळाच रंग*
*पांडुरंग पांडुरंग*
तुझ्या नामाच्या च वाहू दे *मुखातून धारा*
मग सुटेना का *संसाराचा पसारा*
मग होऊ दे *अवलीच्या शब्दांचा मारा*
सहन करील आमुचा हा *देह सारा*
असा तुझ्या *रागाचा एक रंग*
*पांडुरंग पांडुरंग*
*वय, ऊन, वारा, पाऊस* याची कसलीच नसते तुझ्या *वारीत तमा*
*चालून चालून* होत *नाही कोणा दमा*
असते *कृपा दृष्टी* तुझी *आम्हां*
असा *आरोग्याचा एक रंग*
*पांडुरंग पांडुरंग*
जसा *वसलास चंद्रभागेच्या काठा*
येतात अनेक *अडचणीच्या लाटा*
बाहेर येण्याच्या *दावतोस तूच वाटा*
अशा आमच्या *काळजीचा तू एक रंग*
*पांडुरंग पांडुरंग*
होऊ दे पुढच्या *पिढीस संस्कार हे सारे*
तुझ्याच *नामाचे* घुमू दे *मनी वारे*
असा *माऊली नामाचा एक रंग*
*पांडुरंग पांडुरंग*
करून तुझी *पायी वारी*
पोहचलो एकदास *तुझ्या दारी*
होऊ दे तुझ्या *आशीर्वादाने* *नशीब* आमचे *भारी*
येऊ दे आयुष्यात *सुख, समृद्धी* सारी
असा हा आमच्या *आशेचा तू एक रंग*
*पांडुरंग पांडुरंग*
थोर *संतांनी* जाणला तुझा *सावळा रंग*
लिहिले तुझ्या *नामाच्या महिमेचे अभंग*
असा सदा राहा *आमच्या संग*
असा आमुच्या आयुष्याला आकार देणारा *मातृ - पितृ वात्सल्याचा तू एक रंग*
*पांडुरंग पांडुरंग*
*रामकृष्ण हरी*
