STORYMIRROR

Mangesh Medhi

Classics

3  

Mangesh Medhi

Classics

बोला हरी विठ्ठल

बोला हरी विठ्ठल

1 min
15K


विठ्ठल नामा संगे वाजतो मृदुंग

टाळ हाती घेऊनी रंगे भक्ती नाच


माणसा परी अभंग आज भाग्यवंत

भगवत सेवा सदा सदा संत संग


विठ्ठल नामा संगे वाजतो मृदुंग

चार घटका विसरु दु:ख विसरु प्रपंच


नामस्मरण करता करता साधुया परमार्थ

विठ्ठल नामा संगे वाजतो मृदुंग


अंत्तरंगी जडला हाच नाम छंद

मंन:शांती मिळे मिळे आत्मानंद


विठ्ठल नामा संगे वाजतो मृदुंग


भक्ती रसे रंगू चला धरु वारी वाट

सार्थ झाहला जन्म सफल जगणं


चित्त बोले विठ्ठल विठ्ठल

वाणी बोले विठ्ठल विठ्ठल


काया बोले विठ्ठल विठ्ठल

आत्मा बोले विठ्ठल विठ्ठल


म्हणा हरी विठ्ठल विठ्ठल

बोला हरी विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल वीठ्ठल विठ्ठल

विठ्ठल वीठ्ठल विठ्ठल



ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Classics