~सुख ~
~सुख ~
सुखाची परिभाषा ही वेगळी प्रत्येकाची
जगी असा कोणी नाही जो पुर्णतः सुखी
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
जे मिळतं ते मनाला भावतच असं नाही
आणि म्हणून ते एका मृगजळ वाटतं
त्यामागे पळण्यात माणूस दमून जातो
आपल्या नशिबाला दोष देत रहातो
सुख ही काही दिसणारी वस्तू नाही
ती एक मनाची आत्म्याची तृप्ती असते
आणि ती एक वृत्ती असते जी प्रत्येकाची भिन्न
सुख मानण्यावर असतं, दिसण्यावर नाही
कुणाला कसली आशा तर कुणाला कोणती अपेक्षा
कुणाची स्वप्न काय तर कुणाची काय आकांक्षा
प्रत्येकाची सुखाची कल्पना ही निरनिराळी
पण सुख प्रत्येकाच्या झोळीत येवून पडत नसतं
त्यासाठी कष्ट मेहनत प्रयत्न हे करावेच लागतात
आलिशान महालात राहणारा ही सर्वोपरी सुखी नसतो
कुणाला स्वास्थ्याची चिंता तर कुणाला पैशाची
कुणाला व्यवसायाची तर कुणाला कुटुंबाची
कोणाला उत्तम व उच्च शिक्षणाची धडपड
तर कुणाला उत्तीर्ण झाल्यावर चांगल्या नोकरीची काळजी
योग्य मनासारखा जोडीदार मिळून लग्न होण्याची इच्छा
मनाच्या नेहमीच उंच भराऱ्या नाही तिथे अंत इच्छांना
या सर्वांची सांगड परिश्रमाशी घालावी लागतेच
कोणासाठी खूप पैसा संपत्ती मालमत्ता हे सुख
तर कुणासाठी कुटुंबातील सर्व आनंदी असणे हे सुख
कोणासाठी आत्मसुख परोपकार करण्यात असते
तर काही जणं मग्न असतात अध्यात्म सुखात
प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी आगळीवेगळी
नाही सुख मोजयचं कोणताही मापदंड वा साधन
सुख ही एक कल्पना तर कधी हेवा व बरोबरी
ज्याला कर्म करून फळाची ईच्छा नसते तो सुखी
भवद्गीता हाच उपदेश देते आपण सर्वाँना
जे आहे त्यात समाधानी असणं सर्वांना कुठे जमतं
" ठेविले तैसेचि रहावे " असं संत पण म्हणून गेले
प्रत्येकाची आपलं मापदंड ठरवायचं असतं
आणि त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न केले
तर सुख हे मिळणारच, काही भाग असतो नशिबाचा
तरी आपण केलेल्या कर्माचा विश्वास बाळगून
जर पुढे वाटचाल चालू ठेवली तर कधीना कधी
आपल्याला जे हवं ते मिळतच स्वप्न पूर्ण होतात
सुख हे शोधायचं नसतं त्याची थोडी वाट पाहायची
आपल्या कर्मावर नितीवर आत्मविश्वास ठेवला तर
सुख आपल्या पायाशी लोळण घेत येतं ...
सुखाच्या मागे धावणाऱ्या लोकांच्या हाती ते येत नाही
नियती आणि नियत साफ असली तर सुख आणि यश हे आपसूकच मिळतं
मनाची समाधानी व प्रसन्न वृत्ती आपसूकच सुखाच्या जवळ नेते आपल्याला
