STORYMIRROR

Manish Ahire

Abstract Classics Inspirational

3  

Manish Ahire

Abstract Classics Inspirational

गाडगेबाबा

गाडगेबाबा

2 mins
216

स्वच्छतेचा मंत्र, जपा निरंतर l

तयामुळे होई, गाव सुंदर ll

एक हाती झाडू, करी झाडलोट l

तंत्र कीर्तनातुनी, डेबूजी सांगे llधृll


       शेंडगाव खेड, तेथे झिंगराजी बुवा l

       घरी त्याच्या जन्मला पुत्र थोर ll

       झिंगराजी मेला, दारूपायी गेला l

      आईसवे डेबूजी मामाघरी ll1ll


मामाच ते गाव, मूर्तिजापूर नाव l

शेतीवाडी, गुरंढोर बक्कळ असे ll

तेथे लहानाचा डेबूजी मोठा l

करितसे काम शेतीतहो ll2ll


         समाज त्यावेळीचा कसा नीतीभ्रष्ट l

        करीतसे उतारा अंधश्रद्धेचा ll

       एका दगडाला, सेंदूर फासला l

      पूजा अर्चा त्याची अनं म्हणती देव ll3ll


बकऱ्या कोंबड्याचा बळी l

त्या निर्जीव देवाला ll

नको बाबा तू करू पशुहत्या l

खरा तुझा देव त्या जीवात वसे ll4ll


            गाय बैल म्हातारे रे l

          नको इकू कसायाला ll

         नको बाबा बनू कृतघ्न निर्लज्ज l

        गायीला तू म्हणतो माय ना रे ll5ll


नवस तापास अनं ते उपवास l

लेकरासाठी भजतसे दगडाला ll

नवस करुनी जर होती मूलंबाळ l

नवरा करायची बाई, मग गरजच काय ll6ll


        करुनी कीर्तन, जणांसी शिकवण l

       लोकांतली कीड पुसे डेबू ll

      हातामध्ये झाडू स्वच्छ करी गाव l

     गाडगं डोईवरं म्हणून गाडगेबाबा ll7ll


स्वच्छता हेची तंत्र, तोची खरा मंत्र l

करा ग्राम स्वच्छ, घर स्वच्छ ll

तुकोबांचा आदर्श घेऊनीया मनी l

करी डेबू उपदेश कीर्तनांतुनी ll8ll


          उच्चवर्ण अस्पृश्य असे काही नाही l

         सारे वर्ण एक भाई भाई ll

        अस्पृश्याची लाज वाटते त्या देवाला l

        सांगा सांगा बरं मग, तो देव कसा ll9ll


संत माळेतील, डेबू मनी शेवटचा l

करीतसे उपदेश लोकांला ll

गावोगावी जाई, तीर्थस्थळी जाई l

झाडलोट करी ठायी ठायी ll10ll


          भुकेल्यांस अन्नावळ l

         निवाऱ्यास धर्मशाळा बांधीयल्या ll

       गोरक्षण करून उभारील्या गोशाळा l

     रोखली पशुहत्या उपदेशांतुनी ll11ll


चमत्कार बिमत्कार अरे l

असे काही बाही नाही ll

स्वच्छता करुनी कर, भक्ती निसर्गाची l

नाही तयाहुन मोठा देव, डेबूजी सांगे ll12ll


         मनातली बरबट दूर कीर्तनान l

        अज्ञान लोकांतलं सारिले दूर ll

      लोकशिक्षक समाजाचे, त्यांनी तारिले जनमने ll

     नमन तुम्हा गाडगेबाबा,मनिष म्हणे ll13ll



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract