STORYMIRROR

Manish Ahire

Abstract Classics Inspirational

3  

Manish Ahire

Abstract Classics Inspirational

छत्रपती शिवराय

छत्रपती शिवराय

1 min
256

छत्रपती शिवराय

स्वातंत्र्याचे बीज रोविले l

माथ्यावरी शिवनेरीच्या ll

पुत्र जन्मला बाळ शिवाजी l

पोटी आई जिजाईंच्या llधृll


         रामकृष्णांचा अवतार जणू l

        आला ओटी सह्याद्रीच्या ll

        सूर्य तळपला महत तेजस्वी l

        कुळी मध्ये भोसल्यांच्या ll1ll


पावन कुस माय जिजाऊंची l

आला जणू अंश शिवाईचा ll

अंधाराला फेकत मागे l

झाला कर्दनकाळ गणिमांचा ll2ll


         राजनीती हो अहोविख्यातं l

        तया जोड शक्ती बुद्धीची ll

       समशेरीच्या धारेने अनं l

       ठेचली नांगी मुघलांची ll3ll


विर मावळे बाजी तानाजी l

जिवा, शिवा अनं कोंडाजी ll

एकसंघ हो होऊन लढले l

राजे छत्रपती शिवाजी ll4ll


          शास्त्याखानां शास्त केली l

          घेऊन व्याज बोटांचे ll

         फाडला अफजल वाघनखांनी l

       अनं दणाणले धाबे यवनांचे ll5ll


गणिमीकावा शस्र अनोखे l

केली फत्तेशिकस्त राजांनी ll

राज्य रयतेचे सुंदर स्थापिले l

अनं धरीले छत्र मायेचे त्यांनी ll6ll


       दुर्ग उभारीले असे महान l

       हो झाले झाले दुर्गपती ll

       सह्याद्रीही गुज बोलतो l

      अनं गाती सप्तदिशाही कीर्ती ll7ll


परस्त्री माना बहिणींसमान l

अनं साधू सज्जनांसही रक्षिले ll

यवनधिकांच्या नाकी टिच्चुनं l

हिंदवी स्वराज्य निर्मिले ll8ll


      गवतकाडीला हो शेतकऱ्यांच्या l

     होता जिथं दर्जा सोन्यासमान ll

      रामराज्य आलं आलं हो l

     अनं फडफडे भगवा आनंदानं ll9ll


हिंदूपातशहा, जय शिवराया l

गाजली कीर्ती अखंड राजांची ll

आम्ही पामर गातो आरती l

श्री छत्रपती शिवबांची ll10ll



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract