वसुबारस
वसुबारस
दिन दिवाळीचा पहिला l
आला वसुबारसेचा सण ll
दीप पणतीच्या तेजानं l
सुंदर उजळले अंगण llधृll
रमाएकादशी पाठी येई कार्तिक द्वादशी l
पूजा आजदिनी सवत्स धेनु वासरांची ll
नैवेद्यासं गोडधोड पोळी पुरणाची l
औक्षण करुनी तयांचे ठेऊ जाण उपकाराची ll1ll
करते पोषण आपले l
देउनी दही, दुध, ताक लोणी ll
गोमूत्रात तिच्या वसे पूज्य धंन्वंतरी महान l
शेणखतान फुलवी आपुली शेत, वावर नी रान ll2ll
तिच्या पाऊलात असे जणू लक्ष्मीचा वास l
पाहून प्रेमळ मायेनं अनं सोडी दुधदुभत्यांची कासll
देई वृषभांच धन, राबराबन्या शेतीला l
सर्व प्राण्यांमध्ये असे श्रेष्ठ ही बळीराजाची कपिला ll3ll
महान किती ही असे कामधेनु बहूगुणी l
तेहतीसकोट देवांची जणू संगिनी ll
परमपूज्य ही असे तिन्ही लोकाला l
मनिष सदा वंदनीय धेनु गौमातेला ll4ll
