मराठ्यांची गौरवगाथा
मराठ्यांची गौरवगाथा
तलवार उसळे, भाले आले l
यवन कापत सरसर गेले ll
वंदन माझे शौर्याला त्या l
वीर मराठ्यांना पहिले *llधृll*
सुपुत धरेचे, रक्त सांडले l
विर विरश्री रणात लढले ll
स्वत्वासाठी प्रसंगी पडले l
दूत गणिमांस यमाचे झाले *ll1ll*
प्रतीक फडफडे, भगवा झेंडा l
बघा रामराज्य हो आले ll
नांगर फिरूनी स्वातंत्र्याचा l
स्वप्न स्वराज्य मनी पेरले *ll2ll*
समर गाजविले धर्मरक्षणा l
चमकली समशेरींची पाती ll
शिवराय राजा,मल्हारी युगांचा l
बघा थबकला दिल्लीपती *ll3ll*
शेरास सव्वाशेर, राजे संभाजी l
तलवार जणू भवानीची दुजी ll
असुरांस रौद्रशंभु, दिनांस दयापती l
पाहुनीच भ्याली, म्लेंछ सुलतानी छाती *ll4ll*
पालथे जन्मले पण l
घातली मोगलाई पालथी ll
शस्रास्र पारंगत, निष्णांत राजनीती l
विर शोभे राजाराम, मराठ्यांचे छत्रपती *ll5ll*
रणचंडी झाली कृद्ध l
हरपली औरंग्याची शुद्ध ll
उभी समोरी मुघलमर्दीनी l
विरांगना रणीं ताराराणी *ll6ll*
नरपती हो विर सेनानी l
भयभीत दिल्ली दिनवाणी ll
सीमा पल्याड नर्मदा तापी l
जयतु प्रधान, बाजीराव प्रतापी *ll7ll*
यमुना प्रांत टापांखाली l
विर होळकर स्वाभिमानी ll
सुभेदार श्री मल्हारराव l
उभी इंदुरास राजधानी *ll8ll*
शस्रासमवे शास्र सोबती l
अहो विख्यात ती राजनीती ll
अहिल्यादेवी थोर प्रशासनी l
शोभे मराठ्यांची महाराणी *ll9ll*
तख्त दिल्लीवरी फडके भगवा l
किमया महादजींची सारी ll
पानिपतहीं लढले मराठे l
अब्दालीची गुर्मीच गेली न्यारी *ll10ll*
गनिमी कावा शस्त्र अनोखे l
दिधली सह्याद्रीनं भेट असे ll
महादेव हर हर बोला l
स्वराज्य मराठी काळजात वसे *ll11ll*
