STORYMIRROR

Manish Ahire

Abstract Inspirational Others

3  

Manish Ahire

Abstract Inspirational Others

माझ्या महाराष्ट्र देशा

माझ्या महाराष्ट्र देशा

1 min
153

माझ्या महाराष्ट्र देवा l

माझ्या महाराष्ट्र देशा ll

निळ्या, भगव्या अनं हिरव्या l

माझ्या महाराष्ट्र देशा llधृll


     गड डोंगरी साद घुमे l

     हो हर हर महादेवा ll

      वीरांनी रें तुझिया l

     घडविला इतिहास नवा ll1ll


तुझ्या तेजाचं प्रतीकं l

सजले सह्याद्रीचे कडे ll

अग्रभागी तुझिया डौलानं l

भगवा झेंडा हो फडफडे ll2ll


        गोदा, भीमा, तापी l

       चंद्रभागा नी इंद्रायणी ll

     वाहिलं रें तुझ्या मस्तकी l

     त्यांनी क्रांतीचे पाणी ll3ll


झाली जिजाऊ, सावित्री l

अहिल्या नी ताराराणी ll

अन्यायासी हात करुनी l

 अनं वाहिली तुज कुर्बानी ll4ll


         सुखासाठी तुझ्याच घुमली l

        हाक शिवबा राजांची ll

        पेटली मशाल ज्ञानाची हो l

       ज्योती आणि क्रांतीची ll5ll


बहुजन हिताय देती प्रेरणा l

शाहू, फुले, आंबेडकर ll

तख्त राखिले दिल्लीचेहीं तु l

होते किती महान तुझे सरदार ll6ll


        इतिहास आहे साक्षीला l

        वंश तो देवगिरीचा महान ll

       धन्य धन्य ते वीर मावळे l

      लढले घेऊन तळहातावरी प्राण ll7ll


रक्तासमवे धरणी तुझी हो l

अमीरबुक्क्यातही न्हाली ll

नाद निनादली टाळ मृदूंगे l

ती जय जय पांडुरंग बोलली ll8ll


       बोल उठवी माय मराठी l

      शिकवी सुसंस्कारांचे धडे ll

     कीर्ती परी, महाराष्ट्राची थोर l

      उंच गगनासही भिडे ll9ll



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract