STORYMIRROR

Manish Ahire

Others

3.5  

Manish Ahire

Others

शासनाची ठिगळ सडकयोजना

शासनाची ठिगळ सडकयोजना

1 min
76


सबका विकास म्हणता म्हणता l

रस्त्यांचा मात्र अविकासच झाला ll

मतांसाठी केले रस्ते फक्त l

नंतर मात्र कायदा, फक्त कागदावरच आला *llधृ ll*

        मोठमोठ्या खड्डयांनी पुरता l

         रस्ता पूर्ण खंगून गेला ll

       पावसात पुराच्या पाण्यानं अनं l

     सारा डांबरच वाहून नेला *ll1ll*

भले भले खड्डे मोठे l

अपघातांना इथं रोजच निमंत्रण मिळते ll

आदळून आदळून गाड्यांचे तर l

एक एक पार्टच सुटे होते *ll2ll*

         पाणी तुंबून पावसाचे l

         सारा रस्ताच चिखलमय होतो ll

        चाकं घसरून दुचाकींचे l

        रोज खड्डयांमुळेच बळी जातो *ll3ll*

इथून खड्डे, तिथून खड्डे l

सारीकडून खड्डेच खड्डे ll

या खड्डयांमुळे मोडले पार l

हो आम्हा सामान्यांचे कंबरडे *ll4ll*

      निवडणूक जवळ आली कीं l

     मग येतो ऊत रस्त्यांच्या कामाला ll

    तात्पुरते लावून ठिगळं l

    अनं उल्लू बनवितात जनतेला *ll5ll*

स्मार्ट सिटीच्या नावाखाली l

फक्त राजकारणच झालं ll

रस्त्यांवरच्या खड्डयांनी भामट्

यांचं l

सारं पितळच उघडं केलं *ll6ll*

          पूल आणि महामार्ग प्रशस्त l

        बांधले फक्त नाव होण्यासाठी ll

        कधीतरी पाहत जाना साहेब फिरून l

     किती झालीयं दुर्दशा त्यांची मोठी *ll7ll*

खरंच कळतच नाही मला l

रस्त्यात खड्डे कीं खड्डयात रस्ते ll

या रस्त्यांमुळेच आम्हा सामान्यांचे l

पुरे जीवनच झाले सस्ते *ll8ll*

      हेल्मेट सक्ती नित्याचीच l

     म्हणे त्याविनाच बळी जातात ll

    पण कधी येईल शहाणपण यांना l

    कीं अपघात मात्र जास्त, खराब रस्त्यांमुळेच होतात *ll9ll*

टोल नाके भरमसाठ l

पुरे ठीकठिकाणी झाले ll

लोकांकडून उपसलेले पैसे सांगा l

किती रस्त्यांसाठी खर्च केले *ll10ll*

         अहो खराब रस्त्यांमुळे नागरिक l

         रोजच भरडला जातोय ll

       खड्ड एक एक टाळता टाळता l

      सामान्यांच्या नाकी नऊ येतंय *ll11ll*

पण विमानात फिरून साहेब l

रस्त्यांची दुर्दशा कळणार नाही ll

खड्डा हे तर मोठे आभूषण देशाचे l

अनं सरकार करतेय जोपासना, त्याची ठायी ठायी *ll12ll*


Rate this content
Log in