छत्रपती ताराराणी
छत्रपती ताराराणी
शिवरायांची सून पराक्रमी l
जणू जिजाउंची साऊली ll
स्वराज्यसौदामिनी, मुघलमर्दीनी l
ताराऊ रयतेची माऊली llधृll
समशेर हाती घेऊनी l
अनं विजेसम कडाडली ll
पाहुनी रामराणी कृद्ध l
गणिमं भली भली भ्याली ll1ll
मोहित्यांची लेक ती l
उभी रणांगणी ठाकली ll
म्लेंछ मुघल कितीक ठेचण्या l
जणू भद्रकाली कोपली ll2ll
काळसर्प तो औरंग्या l
करीतसे स्वराज्यावरी फुत्कार ll
गरजली वाघीण भोसल्यांची l
घेऊन लखलखती तलवार ll3ll
स्वराज्य भवानीचं कुंकू रक्षिण्या l
ही मशाल अखंड पेटली ll
बुद्धीबळावरी समशेर गाजवूनी l
राणी मराठ्यांची शोभली ll4ll
दख्खनची ती माती थोर l
उभा पाठीशी सह्यागिरी ll
संताजी धनाजी वीर बरोबरी l
अनं केली चितपट पातशाही सारी ll5ll
औरंग्यास त्या मारण्या l
जणू जगदंबाच अवतरली ll
समशेर उसळूनी म्यानातूनी बाहेरी l
अनं हिंदभूमी मुघल असूदांनी माखली ll6ll
देवळे फोडा, मंदिर तोडा l
म्लेंछ म्हणती अल्लाहु अकबर ll
संकट निवारीनी ताराराणी l
तिनं खोदली औरंग्याची कबर ll7ll
करवीर क्षेत्री राजधानी उभी l
हो फडफडे भगवा पन्हाळभाळी ll
हिंदूधर्मरक्षिनी, यवननिर्दालिनी l
विरांगणा जयतु छत्रपती ताराराणी ll8ll
