सौदामिनी
सौदामिनी
कपाळी कुंकूवाची भांग
सुखी संसाराची स्वामिनी
स्वामीला सर्वस्व अर्पणारी
अन्नपुर्णा ही सौदामिनी
परीवार पाठीवर घेवून
गाळा वाहते संसाराचा
थकून भागून हसऱ्या मुखाने
घास भरवते आनंदाचा
पतीच्या सुखात शोधते
मुलांच्या आनंदात रमते
कुणाकडून अपेक्षा विना
कुटूंबाची इज्जत बनते
पती सेवा धर्म समजून
सुख दुःखाची सोबती
पतीच्या वंश वाढवून
पुर्ण जन्म भोगणारी
घराला घरपण देणारी
बिना पगाराची गृहीणी
सर्वांचे मन समजून घेते
असी सुखदायी सौदामिनी