ऋतु हिरवा ऋतु बरवा
ऋतु हिरवा ऋतु बरवा
ऋतु हिरवा ऋतु बरवा
निसर्गाच्या कुशीत
क्षणात पसरला
कसा गारवा?
मेघ वाकले ओझ्याने
टच्च भरलेले पाण्याने
बरसण्या बघा
कसे बावरले?
ओढ आगळी मिलनाची
धुंदावून देई ओळख प्रितीची
धरणी ही लाजली
पहा शृंगारून कशी!
आस वरूणाची लागली
पशू-पक्षी अन् जनमानसास
धरणीलाही लागले डोहाळे
हिरवाईचे खास
थेंबाची मोहनमाळ
घालून नटली गळ्यात
सृष्टी प्रफुल्लित झाली
येता ऋतु हिरवा.....।
बरसता जलधारा
ओवल्या सरी
घेऊन प्रेम संदेश
उभा वसंत दारी
विद्युल्लता सोबतीला
थारा कुठे न तिला
बरसण्या साथ तिची
नभी इंद्रधनू खुलला
भान हरवून गेला
नटखट तो पारवा
पसरला जेव्हा डोंगरकपारित
ऋतु हिरवा ऋतु बरवा.......।

