लावणी
लावणी
1 min
15K
आवड मला सजना शृंगाराची
शिवा की चोळी कटकीच्या खणाची
आणा मला हातभरून हिरवा चुडा
मग लावील प्रित तुमच्या जीवा
पाहून रूप सावळे होई घालमेल मनाची
आवड मला सजना सोळा शृंगाराची।।1।।
नेसीन चंद्रकळा तुमच्या आवडीची
त्यावर घालीन माळ मोत्याची
फुलवू बाग पिरतीची
अहो सजना आवड मला सोळा शृंगाराची ।2।।
नाकी नथ घालीन पुणेशाही
पायात पैंजण घालीन कोल्हापूरी
केसात वेणी माळीन शेवंतीची
अन करीन मग हौस पूरी संसाराची
अहो सजना आवड मला शृंगाराची।।3।।
नको मला शेती राजवाडा
असू दया फक्त प्रेमाचा वेढा
आस फक्त तुमच्या संगतीची
करा हौस पुरी सुवासिनीची
अहो सजना गरज मला तुमच्या संगतीची
अहो सजना आवड मला शृंगाराची।।4।।
