नयन
नयन
1 min
14.4K
का ग सजनी अस करतेस?
मला तुझ्या नजरेत कैद व्हायचय
अन तू मला पापण्यावर थांबवतेस.
का ग सजनी अस करतेस?
तुझ्या नयनांचा मी ग दिवाना
तुज वाचून मन मानेना
स्वप्नातही मिटलेल्या डोळ्यांनाही
पुन्हा पुन्हा ईशारा करतेस
का ग सजनी अस करतेस?
तुझ्या मृगनयनांचा मी ग वेडा
कमलाक्षी तूला पाहण्याचा हर क्षण लागे ओढा
हट्ट तुझा कमी कर ग थोडा
हळूच नजरेने वार का ग करतेस?
सजनी का ग अस करतेस?
वाटे मज सखे तुझ्या नयनातच घर करावे
दुनियेला विसरून तुझ्या कुशीत सामावून जावे
कथीता मी व्यथा मनमोहीनी तू कशी मिश्कील हसतेस
का ग सजनी अस करतेस
शब्दांच्या जागी नयनानेच वार करतेस
अस का ग करतेस.
