STORYMIRROR

Kiran Tarlekar

Classics

3  

Kiran Tarlekar

Classics

आई : मी आणि तू

आई : मी आणि तू

1 min
240

उपमा दिली वाहत्या पाण्याची तूला

तूच दिसली पाहता हरेक चेहर्‍याला

रूक्ष ठरलो जशी वाळू सागरकिनार्‍याला

निरूपयोगी बांधायला कुडाच्याही घराला


अंतर्मुख होऊन होते लिहायचे मला

प्रेमाच्या शब्दांशिवाय लिहू कशाला

काहीतरी हळवे होते लिहायचे मला

वाचा फोडू का हृदयातल्या दु:खाला


समुद्राच्या लाटांनी होते लिहायचे मला

आसवांच्या लाटांनी लागले लिहायला

आपलेपणाचे काही लिहायचे होते मला

हरलो आठवून तूझ्या डोळ्याच्या निरागसतेला


तुझे हृदयातील अस्तित्व दाखवायचेय जगाला

पण कोणी चोरेल म्हणून जीव घाबरला

ऐक ना! आख्खे आयुष्य लिहायचेय मला

पण बाकी काहीच आठवेना सोडून तूला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics