*"जग एवढं का बदललंय... !!"*
*"जग एवढं का बदललंय... !!"*


भुक आता भाकरीची
लागतेय कुठे माणसाला..
बदललेल्या त्या नजरेची
हाव शोधतेय पैशाला...
कोठे जवळीक अन् आपलेपण
आता तुटलेय ते कधीच येथे
मतलबी स्वार्थीपणाचे नाते
मनामनात दडले जेथेतेथे
आता ती पैशाची भींत कशी
नात्यात फुट पाडुन राहीली..
तेच ते रेशीमबंध आजकाल
गळ्याचा फास बनायला लागली...
काल येथे जागे जागेवर
ते अंगण आप्तेष्टांनी भरलेले असायचे..
आज तेथेच त्या सर्व जागांवर
एक औदासीन्य दाटलेले राहते...
ही कसली भुक म्हणायची
लत लागलीय माणसांना या..
माया अन् स्नेहार्द नजरा
आज का बदलल्या इतक्या