"ती दिव्य शक्ती... !!"
"ती दिव्य शक्ती... !!"
असा पाऊस वर्षाव होईल
अशी वीज गगनात कडाडेल
असा सोसाट्याचा वारा वाहील
धुमाकूळ निसर्गाचा होऊन राहील
मी चंद्रमौळी झोपडीतून पाहील
बाहेरची झाडे उन्मळून पडतील
जवळच्या नदीला पूर येईल
गवताच्या पात्यांचे लव्हाळे होईल
पाखरे फडफडून उडू पाहतील
निसर्गाशी उगाच अयशस्वी झुंजतील
काळ्या ढगांतून महाप्रपात बरसेल
जणू इंद्राचा महाप्रकोप शापेल
मिणमिणती आशा मनास वाटेल
ती दिव्य शक्ती माझ्यात येईल
नसानसात शरीराच्या अशी संचारेल
जीवनरूपी नौकेतून मला वाचवेल
