STORYMIRROR

Arvind Kadam

Classics Others

3  

Arvind Kadam

Classics Others

रंग जीवनाचे .....

रंग जीवनाचे .....

1 min
230

लाजवाब रंग सारे जीवनाचे .

मी कोणता सांगू हे द्वंद्व मनाचे.

माझ्या कागदाचे अपूरेपण सारे .

कसे झेलू वार नभीच्या इंद्रधनुष्याचे.

हवा हवासा वाटणारा हा ,

हिरवा रंग माझ्या सुखाचा.

आनंद आणि मनाची प्रसन्नता,

घेऊन येणारा, हा मोर वनीचा.

सुखा सवे नक्की येत असते ,

दुःख काळया सावळ्या रंगाचे.

माणसाला आठवण करून देते ,

आपसूक त्या सावळ्या हरीचे .

जीवनातील अनमोल रंग पिवळा,

आहे त्याग आणि समरपणाचा .

जगण्याला तो अर्थ देईल ,

 महान वारसा हा मानवतेचा .

प्रेम रंगले गुलाबी रंगात .

विविध छटांनी ते साकारते .

मनाच्या अंतरंगात, या रंगांचे .

सदैव मंथन सुरू राहते .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics