STORYMIRROR

Arvind Kadam

Romance

3  

Arvind Kadam

Romance

मृदगंध पावसाचा.....

मृदगंध पावसाचा.....

1 min
207

घडते पहिल्या पावसात सारे 

ओढ भेटीची मनात घेऊन ,


धावती ढगातून थेंब टपोरे .

सोबतीला विजांचे जोश घेऊन .


  थेंब थेंब मिसळता मातीत ,

  रोम रोम धरेचा होतो पुलकित .


  मंद मंद दरवळतो मृदगंध ,

  धूंद धूंद होते मन तुझ्या आठवणीत.


या गंधाळलेल्या ओल्या वाटेवर ,

मी वाट तुझी कधीचा पाहतोय .


मृदगंध हा सखे तुझाच आहे ,

श्वासात माझ्या तो दरवळतोय.


  चिंब भिजलेल्या त्या पावसाला ,

तुझा ठिकाणा मी पुसला . 


  तेवढ्यात वीज चमकून गेली ,

पुढच्या वळणावर चेहरा तुझा दिसला .


घडते पहिल्या पावसात सारे.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance