तुला पाहिले....
तुला पाहिले....
गर्द चांदण्या रात्री एकदा तुला पाहिले
रानभैर तू चाललीस वेचण्या आकाशफुले
चंद्रानेही चमकून तुला होते निहाळले
अवखळ तुझ्या बटांना जेव्हा तू सावरले
अवचित कोठूनी आला मेघ एक सावळा
अंधारून गेला मजसवे तो चंद्र बावळा
जाणून ममव्यथा वाऱ्याने मेघास दूर केले
नच दिसता मज, मुखकमल तिचे साजिरे
सैरभैर चित्त अन मन अधीर झाले
शोधू कुठे तुला मन व्याकुळ झाले
धावणे सुरु झाले दिशाहीन पावलांचे
भान इथे कोणा जमिनीच्या स्पर्शाचे
कितीतरी वेळ सुरु राहिले शोधणे
मनाच्या हिंदोळ्यावरचे बेभान धावणे
ही रात्र कुठे चालली चांदण्यांची वरात घेऊनी
आता एक भीती गेली मनास स्पर्शुनी
झाले इथे जर दिनकराचे जागणे
होईल इथे माझ्या स्वप्नाचे लोपणे
रात्र अन स्वप्नाचे जन्मांतरीचे नाते आहे
डोळ्यात घेऊनी ते स्वप्न धावतो आहे
गर्द चांदण्या रात्री एकदा तुला पाहिले आहे...

