STORYMIRROR

sarika k Aiwale

Classics

3  

sarika k Aiwale

Classics

मृगछाया

मृगछाया

1 min
337

जरा सरता वसंत

ऋतू बहराचा येई

मनी गारवा भरुनी

भास मृगछाया देई 

जरा उसंत पावसा

तप्त धरा ही जाहली

आस मृग नक्षत्राची

सृष्टी आसक्त जाहली 

जरा बेधूंद हवाही

मृदगंध उरे मनी

डोळा चुकवूनी आस

मृगतृष्णा लागे जनी 

जरा प्रतीक्षेत आज

शेतकरी या जगीचा

यावे मृगीचे नक्षत्र

पडो सडा पावसाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics