Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

श्री.दत्तात्रय धनावडे

Inspirational

4  

श्री.दत्तात्रय धनावडे

Inspirational

देवा काय अपराध माझा.....

देवा काय अपराध माझा.....

1 min
14.4K


देवा काय अपराध माझा मी जन्मासी येवुनी |

काय गुन्हा माझा जन्म घेतला कन्या म्हणोनी ||


पुर्वजन्मीच पापच होत देवा तच पडल पदरी |

का रे देवा जन्म घेतला मी रे मायेच्या ऊदरी ||


काय देवा गुन्हा त्या गरीब बिचाऱ्या पित्याचा |

काय अपराध त्या माऊली जन्मदात्या मातेचा ||


हवा पुत्र म्हणोनी होतो रे देवा माझा छळ सुरू |

कन्या होताच मात्र होतो रे सासरचा खेळ सुरू ||


सांगणा रे देवा,देवा का द्वेष,राग करतात माझा |

सदैव पाठीराखा देवा तुच आहेसना रे माझा ||


लक्ष्मी ह्या घराची,मी असे ह्या घराचा रे पाया |

सांगणारे देवा कुठे गेली ,ममता आणि माया ||


राहीलाच रे गर्भ ऊदरात घेतात निदान करून |

नको असता कन्या का घेतात गर्भपात करून ||


चुकुन झालीच कन्या, माया तीला वरून-वरून |

नकोशी झालीच की टाकतात रे तिला मारून ||


कधी सडकेवर नं कधी मंदिरात देतात रे सोडुन |

अरे देवा यांचा रंगलेला डाव टाक रे तू मोडुन ||


का रे देवा असा होतोरे माझा आयूष्य भर छळ |

स्वबळावर जगण्याच देवा आता तरी दे तू बळ ||


विटआला जगण्याचा विचार,तरी करू कुणाचा |

हा खेळच" माझ्या नशिबाचा,माझ्या जीवनाचा ||


कुणाला रे सांगु देवा ह्या सासरची माझी कथा |

कुणाशी मांडु देवा माझ्या जीवनाची ही व्यथा ||


किती वेळा सांगु देवा माझ्या आयुष्याची गाथा |

सांग कधी बंद करशील देवा हूंडाबळीची प्रथा ||


सांगणारे देवा तू सांगणा काय रे अपराध माझा.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational