STORYMIRROR

श्री.दत्तात्रय धनावडे

Others

3  

श्री.दत्तात्रय धनावडे

Others

आई-बाबा तूम्ही एकदा

आई-बाबा तूम्ही एकदा

1 min
28.3K


आई-बाबा तूम्ही एकदा 

मलाही वेळ द्या ना......


जन्म होताच माझा बाबा तुम्ही, 

मला पाळणा घरात सोडुन दिलं | 

त्या दिवसा पासुनच माझं एकट, 

एकट जगण मला नकोस झालं ||१||

म्हणून म्हणतो आई-बाबा तुंम्ही 

थोडा मलाही वेळ द्या ना.......


खरच सांगतो आई-बाबा थोडा, 

तुंम्ही एकदा मलाही वेळ द्या ना |

दिवस भर एकांतात असतो मी,

तुंम्ही कधी सोबत राहुन बघाना ||२||

म्हणून म्हणतो आई-बाबा तुंम्ही 

थोडा मला ही वेळ द्या ना.......


तुंम्ही निघुन गेलात कामावर की,

मला घर कसं खायाला ऊठत ना |

मी एकटाच पडतो हो दिवस भर,

संध्याकाळी लवकर घरी या ना ||३||

म्हणून म्हणतो आई-बाबा तुंम्ही 

थोडा मलाही वेळ द्या ना........


दिवस भर मी असतो हो शाळेत,

माझ्या भविष्याकडे जरा बघाना |

पैसा सर्वच कमवायला आलोय, 

थोडी माझीही काळजी घ्याना ||४||

म्हणून म्हणतो आई-बाबा तुंम्ही 

थोडा मलाही वेळ द्या ना........


संध्याकाळी येता दोघेही थकुन,

मला एक एक गोड पप्पी द्याना |

बस्स झाल मोबाईलवर खेळणं,

मला तुंम्ही थोड जवळ घ्या ना ||५||

म्हणून म्हणतो आई-बाबा तुंम्ही 

थोडा मलाही वेळ द्या ना........


खरच वेळ द्याना.....

खरच वेळ द्याना.....


Rate this content
Log in