मैत्री साठी...
मैत्री साठी...
मैत्रीचं वेड हे किती असावं,
आपलंच सर्वस्व विसरून बसावं.
मैत्रीसाठी नजर भिरभिरावी,
तिच्याच साठी झोप ही उडावी,
मैत्री साठी भूक मरावी,
तिच्याच साठी तहान हरावी.
मैत्री म्हणजे सुखाचा खजिना,
तीझ्याचसाठी देह असा भजावा.
मैत्री म्हणजे विश्वासाचा ठेवा,
आणि गोडी गुलाबीचा मेवा.
रात्री अपरात्री आधार मैत्रीचा,
नात्यापेक्षा नक्कीच खात्रीचा.
