STORYMIRROR

Pradnya deshpande

Inspirational

3  

Pradnya deshpande

Inspirational

पाऊस

पाऊस

1 min
193

सरसर धारा ग्रीष्म ऋतूच्या

 ओलीचिंब धारा

हिरवा साज छटा आगळ्या

इंद्रधनू देेेेखणा


पडघम पडघम निनाद करतो

गर्जतो अंबारी

कधी बरसतो तालासुरात

थुई थुई नाचुनी


 रानोरानी डोलती पिके

धनी सुखावतो

आनंदाने डोळे पानावती

कृतकृत्य होतो


नद्या तळी तुडुंब भरुनी निसर्ग

थंडावा पसरवतो

भेगाळल्या धरणीचा

दाह शांत करतो


असाच ये तू सुख बरसुनी

घरे ना वाहू दे

जीवितहानी नको नको

हर्षाने बरसो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational