STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Inspirational

3  

Ashok Shivram Veer

Inspirational

शिक्षक म्हणजे

शिक्षक म्हणजे

1 min
162

शिक्षक म्हणजे बंधनांची मालिका,

शिक्षक म्हणजे वेदनांची तालिका


शिक्षक म्हणजे मुलांना शिकविणे,

शिक्षक म्हणजे समाज घडविणे


शिक्षक म्हणजे जपून शब्द बोलणे,

शिक्षक म्हणजे सरळ मार्गी चालणे


शिक्षक म्हणजे कमांडर,

शिक्षक म्हणजे ऑल राऊंडर


शिक्षक म्हणजे संयम मनावर,

शिक्षक म्हणजे ताबा हातावर


शिक्षक म्हणजे साऱ्याच गणना,

शिक्षक म्हणजे विना भावना


म्हणूनच...

शिक्षक म्हणजे बंधनांची मालिका,

शिक्षक म्हणजे वेदनांची तालिका.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational