पोलीस
पोलीस
आम्ही देतो अपराध्यांना शिक्षा पकडतो गुन्हेगार,
कधीकधी दहशतवादीही होतात एखाद्या चकमकीत ठार
कधीकधी आम्हालाही होतो विकत घेण्याचा प्रयत्न,
प्रामाणिकपणा आणि निष्ठा सोडत नाही, देशासाठी जीव देणारं हे अनमोल रत्न
प्रशासन आणि कायदा दोन्ही बाजूंनी येतो अाम्ही कधीकधी अडचणीत,
गुन्हेगाराला होते तशी निरपराध्याला व्हायला नको शिक्षा हे सांभाळावं लागतं गणित
प्रचारसभा, मोर्चे, आंदोलनं, रहदारी सगळंकाही सुरळीत पार पाडावं लागतं,
त्यासाठी आम्हाला सणवार-घरदार सगळं सोडावं लागतं
आम्ही लढतो प्राणपणानं आम्हाला हवी नागरिकांची साथ,
खऱ्या अर्थाने धन्य होतात कायद्याला मदत करणारे हात!
