STORYMIRROR

प्रदीप माने

Inspirational

3  

प्रदीप माने

Inspirational

आनंदोत्सव

आनंदोत्सव

1 min
143

चला मिळून आनंदोत्सव साजरा करू या,

उदासवाण्या चेहऱ्यांवर आज हसू आणू या


मंदिर मशिदींना उजळून टाकलंय कैकदा,

चला अंधारल्या घरात एखादा दीप लावू या


केले मुक्तहस्ते दानधर्म बहु पुण्य कमवाया,

कुण्या हाताला कमविण्याचे कौशल्य देऊ या


पाषाणावर केले अभिषेक दुधाचे घडाभर,

तहानलेल्या जीवा घोटभर पाणी पाजू या


आहेत जगण्याच्या निरनिराळ्या वाटा जरी,

प्रत्येक वाटेवर एक झाड लावत जाऊ या


काय द्यावा प्रसाद तीर्थयात्रा करून येता,

दुःख विकत घेऊन साऱ्यांत आनंद वाटू या


देवही आठवतो लोकां मतलबापुरता येथे,

बेमतलब कुणासाठी तरी वेळ खर्चू या


माणसाला माणुसकी समजू द्या फक्त,

मूर्तीत नको, चला माणसात देव शोधू या



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational