STORYMIRROR

प्रदीप माने

Fantasy

3  

प्रदीप माने

Fantasy

मी न कोण साधू

मी न कोण साधू

1 min
132

मी न कोणी साधू, न अवतार आहे,

मी माझी प्रेरणा, मीच माझा चमत्कार आहे


ओळखणारे मज अजुनी न जाणती हे,

मी माझे बिंब, मीच माझा आरसा आहे


लडखडण्याचा शौक उनाड पावलांस माझ्या,

मी माझा प्याला, मीच माझी मधुशाला आहे


उठलीत बोटे मजवर मज नसे पर्वा त्याची,

मी माझा गुन्हा, मीच माझा साक्षीदार आहे


चुकला यत्न दुनियेचा मज फासण्याचा,

मी माझे सावज, मीच माझी शिकार आहे


अखंड तरण्याची दिली शाश्वती माझी मला मी,

मी माझी लाट, मीच माझा समुद्र आहे


किती कापले अंतर, किती फर्लांग उरले,

मी माझी पायवाट, मीच माझी मंजिल आहे


खचलो जेव्हा जेव्हा दिले स्फुरण मलाच मी,

मी माझा संवाद, मीच माझा आवाज आहे


मरणास माझ्या दिला मी माझा पत्ता जन्मत:,

मी माझा काळ, मीच माझा अंत आहे


मी न कोणी साधू, न अवतार आहे,

मी माझे कर्म-धर्म, मीच माझा ईश्वर आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy