कृष्ण लीला
कृष्ण लीला
कृष्णा ची दुनिया पाहिली जणू साक्षात
तेथे होत्या गोपिका त्या दिव्य महालात
सोन्याची ती वेस त्याला हिऱ्यांची फुले
पाहता डोळे दीपती अद्भुत चमचमती किरणे
पुढे जाता बगीचा स्वर्णिम दिव्य वृक्ष लता
पानो पानी ते चैतन्य प्रत्येक हेलकावा दिव्यता
फांद्यांवरी पक्षी ते नानापरी रुपे सजलेले
त्यांना पाहता जीवनाचे रूप त्यांनी घेतलेले
त्यांची पिले बागडती रत्ने कुस्करली पंखावरी
डोळे जणू पारदर्शी सागर अविरत तेज चेहऱ्यावरी
प्रत्येक वृक्षाभोवती कडे गवतही सोन्याचा गालिचा
पुढे पुढे जाता प्रत्यक्ष रूपडा स्वप्नांचा
महला जवळी जाता जणू पंचतत्व आरामात विसावले
प्रत्येकाने मेहनतीने ते वातावरण सजविले
इतका मोठा महाल पाहीन तोवर खोल्या
खोल्या कसल्या दिवाणखाने काय वर्णव्या रत्न पाकळ्या
आत प्रवेशता स्वर्ण फरशी त्यात मध्ये मध्ये विश्व आकार
काय वर्णावा थाट अवघ्या आनंद होईल साकार
खांब भिंती रत्न हिऱ्यांनी घडलेल्या उत्तुंग आकार
मध्ये बरोबरी दरबार सर्व ऐश्वर्या लोळती पार
मध्ये विराजमान श्रीकृष्ण धन्य झाले जीवनाचे
हे रुपडे आता अखंड विराजे हृदयाजे
असा हा देखावा दाखवणे त्याचीच सिद्धता
वर्णन हे घडते सारी त्याचीच धन्यता||
