क्षणभंगुर आयुष्य उरले
क्षणभंगुर आयुष्य उरले
या नभीचा चांदवा
गिरवी आहे अंगणी
उसने भाव तरळते डोळा
येते उगाच न पाणी
क्षण क्षण आतुर काया
मन बहकते तयासवे
होते मन फुलपाखरू
जगते क्षणभंगुर आयुष्य
घेते सामावून डोळ्यात
मनाला भावते ते जग
झरा होऊन वाहते मन
ओढ धराची नभीच्या मनी
क्षणात आहे क्षणात नसेन ही
क्षणभंगुर आयुष्य उरले
क्षणार्धात संपतो इथे
जपल्या जीवनाचा प्रवास
