नर्तकी
नर्तकी
नर्तकी
करून नाद
पायात घुंगरांचा साज
चढवून नाचत आली आज.
नर्तकी
नार देखणी
शालू भरजरी अंगावर
नृत्य सुंदर चाले तालावर.
नर्तकी
भासते जणू
अप्सरा स्वर्गातील सौंदर्यवती
पाहून मन होते खालीवरती.
नर्तकी
सादर करती
ढोलकीच्या तालावर आदाकारी
सर्वांच्या नजरा लागल्या तिच्यावरी.
नर्तकी
आपल्या आविष्कारातून
मन मोहून टाकते
नजरा सगळ्यांच्या खिळवून ठेवते.

